
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने टीम इंडियाच्या मॅचविनर खेळाडूला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना शोएबने टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला हा सल्ला दिला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये पंतने दमदार कामगिरी केली होती. निर्णायक एक दिवसीय सामन्यात त्याने शतकी खेळी करत संघाला मालिका विजय मिळवून दिला होता.
इंग्लंडमध्ये ऋषभ पंत याने कसोटी, टी-20 आणि एक दिवसीय लढतीतही चांगली कामगिरी केली. फक्त फलंदाजीच नाही तर यष्टीमागेही त्याचा चपळपणा वाखानण्याजोगा होता. या कामगिरीने टिकाकारांचे तोंड बद झालेले असताना शोएब अख्तर याने पंतच्या फिटनेसवर चिंता व्यक्त केली आहे.
ऋषभ पंत याचे नाव आपण ऋषफ फेंटा ठेवल्याचे शोएब म्हणाला. तो खुप फटकेबाजी करतो. पंतकडे कट शॉ. पुल शॉट, रिव्हर्स स्वीपसह अनेक शॉट्स आहेत. तो गोलंदाजांना घाबरत नाही. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये संघाला विजय मिळवून दिला, इंग्लंडमध्येही संघाला मालिका विजय मिळवन दिला. परंतु त्याचे वजन थोडे जास्त आहे. पंतने आपले वजन कमी करावे, असा सल्ला शोएबने दिला.
इंडियाचे मार्केट मोठे आहे. ऋषभ पंतने वजन कमी केले तर तो रोलमॉडल होऊ शकतो आणि कोट्यवधी कमवू शकतो. इंडियामध्ये एखादा खेळाडू स्टार बनला की तो खुप मोठा होतो. पंतकडे खुप टॅलेंट आहे. विरोधी संघाला तो संकटात टाकू शकतो. इंग्लंडमध्ये त्याने विचारपूर्वक फलंदाजी केली. तो कधीही गिअर बदलू शकतो, असेही शोएब म्हणाला.
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या एक दिवसीय लढतीत डाव संकटात असताना पंतने नाबाद शतकी खेळी केली होती. आता तो वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 मालिका खेळताना दिसेल. एक दिवसीय मालिकेतून त्याला आराम देण्यात आला आहे. येथे टीम इंडियाला तीन वन डे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
Ben Stokes – अखेरच्या एक दिवसीय लढतीत स्टोक्सने मन जिंकले, चिमुरड्याला दिली खास भेट

























































