
विराट कोहली सध्याच्या घडीला अपयशी फॉर्मचा सामना करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही विराट जादू दाखवू शकला नाही. मात्र विराटला जर पुन्हा फॉर्मात परतायचे असेल तर त्याने त्याने आपले डोके शांत ठेवायला हवे. विराटने सध्याच्या घडीला जास्त विचार न करता लहान ‘लक्ष्य’ डोळय़ापुढे ठेवायला हवे. पहिल्यांदा 10 धावा करेन, त्यानंतर 20 आणि पुढे जाईन, असे विराटने ठरवायला हवे. त्यामुळे त्याला आपल्या खेळावर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असा मोलाचा सल्ला क्रिकेट प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी विराटला दिला आहे. विराटने शांतपणे खेळ केला पाहिजे. विराट शांत असेल तेव्हा त्याची फटक्यांची निवडही योग्य होईल आणि चुका करण्यापासून तो परावृत्त होऊ शकतो. विराटने खेळपट्टीवर जास्त काळ व्यतित केला पाहिजे, असे मत अमरे यांनी व्यक्त केले.





























































