नियमांचे पालन होत नसल्याने नगरमधील दुकाने पुन्हा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने व्यवहार सुरळीत करण्यासाठी काही अटी शर्ती लागू करून व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, सरसकट सगळी दुकाने सुरू करण्यात आल्याने शुक्रवारी महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाने दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे दुकानदारांना दुकाने बंद करून घरी परतावे लागले आहे.

दोन दिवसापासून जिल्हा प्रशासनाने आदेश काढून व्यवहार सुरळीत करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, त्यामध्ये ज्या अटी व नियम होते त्यांचे पालन होत नाही, असे दिसून आले आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहेत. कोणत्याही प्रकारे उद्योग व्यवसाय सुरू करताना जे काही नियम व अटी आपण दिले आहे, त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली पाहिजे, असे असतानाही नगरमध्ये सहजपणे सर्व दुकाने व तयारी आणि व्यापाऱ्यांनी सुरू केली होती. शुक्रवारी सकाळी येथील चितळे रोड, माणिक चौक, माळीवाडा रोड यासह आदी भागांमध्ये आणि अनेकांनी आपले व्यवहार सुरू करण्यासाठी दुकाने उघडली होती. वास्तविक पाहता एका शाखांमध्ये पाच दुकान उघडण्याची परवानगी होती. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सुद्धा त्यामध्ये समावेश होता. मात्र, एकाचवेळी सर्व दुकाने उघडल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी तात्काळ याची दखल घेत दुकाने बंद केली. दुकाने बंद न केल्यास दंडही केला जाईल, असा इशारा दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली.