दुकानातील मांस पळवल्याने कुत्र्याच्या पाठीत सुरा खुपसला!

743
murder-knife

दुकानातील मांस पळवल्याने एका विक्रेत्याने कुत्र्याच्या पाठीत सुरा खुपसल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे घडली. वरोरा शहरातील मटण मार्केटमध्ये सुरू असलेल्या एका दुकानातून कुत्र्याने मांस पळवले. दुकानदाराचे दुर्लक्ष असल्याने पाहून कुत्र्याने दुकानातून मांस लांबवले. या कुत्र्यावर नजर जाताच मांस विक्रेत्याने कुत्र्याला पकडून त्याच्या पाठीत सुरा खुपसला. सुमारे तीन ते चार इंच हा सुरा आत घुसला. वेदनेने विव्हळत असलेला हा कुत्रा पाठीत रुतलेला सुरा घेऊन भुंकत राहिला. या प्रकाराची माहिती शहरातील काही वन्यजीवप्रेमींना मिळाली आणि त्यांनी या कुत्र्याला पकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरा बाहेर काढला. मात्र, जखम मोठी असल्याने त्याला उपचारासाठी बांधून ठेवण्यात आले. मुक्या प्राण्यांशी अमानुषपणे वागणाऱ्या या मांस विक्रेत्याची पोलिसात तक्रार केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या