केईएममध्ये शॉटसर्कीट; जीवितहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

परळच्या केईएम रुग्णालयात सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्कीट होऊन आग लागली. या घटनेचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या पाच गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पहिल्या मजल्यावरील डायबेटीसच्या ओपीडीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन धूर निघू लागला. त्यामुळे सगळीकडे घबराट पसरली होती. याच ओपीडीच्या खालोखाल तळमजल्यावर अपत्कालीन ओपीडी सुरू होती. त्यामुळे जर आगीने रौद्ररुप धारण केले असते तर मोठी दुर्घटना घडली असती.