हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या

हिवाळ्यात आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलतात. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ पसंत करतात, तर हिवाळ्यात गरम पदार्थ पसंत करतात. फळे अनेकदा थंड असतात, म्हणूनच लोक हिवाळ्यात फळांचे सेवन कमी करतात. हिवाळ्यात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, की त्यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढतो, असा प्रश्न अनेकांना पडतो, तर यामागील नेमकं तथ्य काय आहे हे जाणून घेऊया.

हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी हळदीसोबत हे पदार्थ खायलाच हवेत

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, हिवाळ्यात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तथापि, हिवाळ्याच्या काळात केळीचे सेवन काळजीपूर्वक करावे. सर्दी किंवा सायनसचा त्रास असलेल्यांनी रिकाम्या पोटी किंवा झोपण्यापूर्वी केळी खाणे टाळावे. हिवाळ्याच्या काळात दुपारी केळी खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. केळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी६ आणि अँटिऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

केळी बराच काळ पोट भरलेले ठेवते. थंड हवामानात शरीराची ऊर्जा खर्च होते, तेव्हा केळी उबदार ठेवण्यास आणि सहनशक्ती राखण्यास मदत करतात. स्नायूदुखी, अशक्तपणा आणि थकवा देखील केळी खाण्यामुळे कमी होते.

दररोज सकाळी दूध आणि केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

हिवाळ्यात पचनक्रिया अनेकदा मंदावते, अशावेळी केळी खाणे सर्वात उत्तम.

केळीमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे सर्दी आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.

बहुतेक लोकांसाठी केळी सुरक्षित मानली जातात. परंतु ज्यांना वारंवार सर्दी किंवा घसा खवखवण्याचा त्रास होतो त्यांनी ते खाणे टाळावे. मधुमेहींनीही मर्यादित प्रमाणात केळी खावीत, कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. याव्यतिरिक्त, दमा किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच केळी खावीत. जर तुम्हाला हिवाळ्यात केळी खायची असतील तर नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणानंतर खावीत. रात्री किंवा थंड पदार्थांसोबत केळी खाणे टाळा.