यंदा इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, श्रद्धा कपूरची भक्तांना विनंती

814

सध्या शूटिंग बंद असल्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर आपला पूर्ण वेळ कुटुंबाला देत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावरील फॅन्ससाठीही ती वेळ राखून ठेवते. इन्स्टाग्रामवरील तिचे पोस्ट आणि व्हिडीओ बघितले की याची कल्पना येईल.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धाने एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमधून तिने यंदाच्या वर्षी ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करावा, अशी विनंती सर्वांना केलेय. श्रद्धा मराठमोळय़ा कुटुंबातील असल्याने तिच्या घरी गणेशोत्सत जल्लोषात साजरा होतो. यंदाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तिने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. तिने व्हिडीओ शेअर करून पर्यावरणाची कशी हानी होते ते दाखवले आहे आणि पर्यावरणपूरक बाप्पा घरी आणा असं म्हटलंय.

श्रद्धा ही पर्यावरणप्रेमी आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. सोशल मीडियावरील तिच्या पोस्ट बघून याची प्रचीती येते. प्राण्यांच्या हक्कासाठीही ती नेहमी आवाज उठवते. काही दिवसांपूर्वी प्राण्यांच्या हिंसेविरोधातील मोहिमेत ती सहभागी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या