नखुल्या, सांदणी… श्रावणात बनवा हे पारंपारिक गोडाचे पदार्थ

>> प्रतिनिधी

उत्साहानं भारलेलाकुलाचाराचं पालन करायला शिकवणारानटण्यामुरडण्याचा थाट लाभलेलाऊनपावसाचा खेळ खेळणारासृष्टीचं बदललेलं, आल्हाददायक रूप घेऊन आलेला श्रावण महिनाश्रावणाची नजाकत काही औरचत्याची सर दुसऱ्या कोणत्याही महिन्याला नसावीश्रावणात बहुतेक फुलझाडांना मोहर येतोत्यामुळे सृष्टी मंद, मोहक सुगंधाने बहरलेली असते. त्यासाठीच की काय जणू या महिन्यात अनेकविध क्रतवैकल्ये केली जातात. सासरवाशिणीचा, बहीणभावांचा, मंगळागौरीचा आणि अनेक उपासतापासांचा हिरवागार श्रावण प्रत्येकासाठीच उत्साहवर्धक ठरतो. गोडाधोडाचा नैवेद्य हे श्रावणाचे खास वैशिष्टय़.

शिवामूठ

 श्रावणातले सोमवार, शनिवार, मंगळागौर, जिवती पूजन, रक्षाबंधन, श्रावणी शुक्रवार, शीतला सप्तमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्म,  भोंडला, हळदीकुंकू अशा प्रत्येक दिवसाचा, सणाचा नेवेद्यही ठरलेलाच. पारंपरिक पदार्थांनी जेवणाची लज्जत वाढवणारा…वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या चवींची, जिव्हासौख्यासह आपल्या खाद्य संस्कृतीची ओळख करून देणारे आहेत. दूध-साखर, चणे-फुटाणे, कृष्णजन्माष्टमीला दूधपोहे, नारळीपौर्णिमेला नारळीभात, शीतला सप्तमीला सांदणी, उकडीच्या शेंगा, दिंड, पात्या, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरींसह अळूची वडी, कोथिंबिरीची वडी, बिरडं, फरसबीची भाजी, गवलाईची खीर… असे अनेक चवींचे प्रकार घरोघरी केले जातात. श्रावणमासानिमित्त काही नैवेद्याचे प्रकार पाहूया.

पुरणाचे दिंड

2 वाटी गव्हाचं पीठ चाळून त्यात 1 चमचा तेलाचं मोहन आणि चवीनुसार मीठ घालून घट्टसर मळून घ्यावे. 15 मिनिटे झाकून मुरण्याकरिता ठेवावे. मळलेल्या कणिकेचा गोळा घेऊन त्याची पातळ पुरी लाटावी. त्यामध्ये पुरण भरावं आणि ते चौकोनी आकारात बंद करावं. मोदकपात्र असेल तर त्यामध्ये किंवा एका मोठय़ा पातेल्यात पाणी गरम करत ठेवावे. मैद्याऐवजी गव्हाचे पीठही वापरता येते.

सांदणी 

शीतलासप्तमीला सांदणीचा नैवेद्य दाखवतात. नारळ खवून त्या किसात अगदी थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. गाळणीने गाळून दाट दूध काढावे. राहिलेल्या चोथ्यात पुन्हा थोडे पाणी घालून वाटावे. आता जे दूध निघेल ते आधी काढलेल्या दुधाच्या तुलनेत पातळ असेल. हे पातळ दूध वेगळे ठेवावे. आता तांदळाच्या रव्यापैकी पाव भाग रवा एका पातेल्यात घेऊन त्यात हे पातळ दूध घालून गॅसवर ठेवून शिजवावे. 2-3 मिनिटांत ते शिजून गोळा होईल. नंतर दाट नारळ दुधात उरलेला पाऊण भाग रवा आणि साखर एकत्र करून ढवळावे. त्यात वेलची, जायफळ, केशर, काजू-बदाम काप घालावेत. पूर्ण गार झाल्यावर या मिश्रणात मिसळावा. गुठळ्या मोडून घ्याव्यात. ढोकळा पात्रात हे मिश्रण ढवळून ओतावे आणि कुकरमध्ये 10-15 मिनिटे वाफवून घ्यावे. थंड झाले की, वडय़ा पाडाव्यात.

खांडवी

श्रावणातल्या सोमवारी खांडवी, आयते या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. तांदूळ धुऊन वाळवून त्याची जाडसर भरडी काढून घ्यावी. ही भरडी चांगली तांबूस होईपर्यंत कडल्यात भाजून घ्यावी. भरडीच्या दीडपट पाणी घ्यावं. ते एका मोठ्या पातेल्यात उकळत ठेवावं. त्यात जेवढी भरडी तेवढाच गूळ घालावा (म्हणजे दोन वाट्या भरडी असेल तर दोन वाट्या सपाट गूळ घ्यावा). मूठभर खोबरं घालावं, पाण्यात थोडंसं आलं किसून घालावं. किंचित हळद घालावी आणि चवीपुरतं मीठ घालावं. पाणी चांगलं उकळल्यावर त्यात भरडी घालावी.

मालत्या

मालत्या बनवताना वरच्याप्रमाणेच कणीक मळावी. यात जरा मोठय़ा आकाराचे गव्हले पाडून पीठ पसरून पोळपाटावर लांबट सुरळ्या कराव्या. सुरळीच्या डाव्या टोकापासून सुरुवात करून अंगठय़ाने हळूच तिरके फिरवून सुरळीच्या दुसऱ्याटोकापर्यंत गेले की, त्याचा स्प्रिंग रोल बनतो. या मालत्या करून ताटात वाळवून त्याची खीर नैवेद्यासाठी करतात.

आयते

तांदळाच्या पिठाची धिरडी म्हणजेच आयते. आयत्यांसाठी तांदूळ धुऊन, वाळवून मग त्याचं पीठ करावं. अर्धे दूध आणि अर्धे पाणी घेऊन त्यात ते पीठ भिजवावं आणि त्याचे काहिलीवर पातळ आयते घालावेत. नारळाचं दूध काढून त्यात थोडासा गूळ घालावा (नारळाचं दूध जरा घट्टसर काढावं) आणि त्या दुधातून हे आयते खाण्याची प्रथा आहे.

गव्हले

कणीक आणि बारीक रवा-दुधात भिजवून त्याचा गोळा मळा. अगदी थोडे पीठ चिमटीत घेऊन त्याच्या बारीक सुरळ्या करून सुरळीचे शेवटचे टोक चिमटीत धरून दुसऱ्याचिमटीने हळूहळू लांबट तुकडे ताटात पाडून वाळवावेत. याला गव्हले असे म्हणतात. त्यांची शेवयांप्रमाणेच खीर करता येते.

नखुल्या

पिठाचे हरभऱयाएवढे गोळे करून नंतर जरा चपटे करून अंगठय़ाच्या नखाने त्याला टोचा. मध्यभागी असे टोचल्याने जो आकार येतो त्यालाच नखुल्या म्हणतात. त्यादेखील वाळवून त्यांची खीर केली जाते.

 

आपली प्रतिक्रिया द्या