
नागपुरातील कोराडी येथील श्री जगदंबा महालक्ष्मी मंदिराचा निर्माणाधीन भव्य प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत 17 जण जखमी झाल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मदतकार्यासाठी पोलिस प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. ढिगा-याखाली अनेकजण दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.