श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये गोळीबारात आठ जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकेतील कोलंबो बंदरात आज सकाळी गेट 06 जवळ सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात तीन महिलांसह आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कोलंबो नॅशनल रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंदराच्या गेट 06 वरील सुरक्षा रक्षकाने एक्सप्रेसवेच्या बांधकामाच्या ठिकाणी गोळीबार केला. या एक्सप्रेसवे वर एका गटाने रस्ता बांधकाम साइटवरून लोखंड चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती झाल्याने सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला असल्याचे वृत्त डेली मिररने दिले आहे.

ब्लोमेन्डल स्ट्रीटवरील बांधकाम साइटवर दोन व्यक्ती लोखंड चोरण्याच्या उद्देशाने आले होते. या चोरांनी दुसऱ्या सुरक्षा रक्षकाची बंदुक हिसकावण्याचा प्रयत्न करत होते. या चोरांना रोखण्यासाठी जमावाने प्रयत्न केला. यावेळी तणावपूर्ण परिस्थिती झाली होती, गेट 06 वरील सुरक्षा रक्षकानला नेमकी परिस्थिती न समजल्याने त्याने जमावावर गोळ्या चालवल्या. आठ जणांपैकी चार जणांना किरकोळ जखमा झाल्या असून आठही जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती डेली मिररने दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.