
सामना प्रतिनिधी । विलेपार्ले
सांताक्रुझ वाकोला येथील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने कबड्डीतील आपली विजयी दौड कायम राखत जॉली स्पोर्टस् क्लब, पार्ले आयोजित राज्यस्तरीय कबड्डीत ‘ब’ गटाच्या अंतिम लढतीत गावदेवी क्रीडा मंडळावर 25-17 अशी दणदणीत मात करीत आपल्या जेतेपदांच्या भात्यात आणखी एक मोठ्या विजेतेपदाची भर टाकली. या गटात श्रीकृष्णच्या परेश शेट्टी (उत्कृष्ट पकडी) आणि राजेश पुजारी (उत्कृष्ट चढाया) असे दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार पटकावले.




























































