
नगरचा माजी वादग्रस्त उपमहापौर श्रीपाद छिंदम याने 2018 साली छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर त्याची भाजपमधून हकालपट्टी देखील करण्यात आलेली. याप्रकरणी छिंदमला अटक देखील झाली होती व तो बरेच दिवस येरवडा तुरुंगात कैद होता. त्याच शिवद्रोही छिंदमने आता विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीपाद छिंदम याची ऑडिओ क्लिप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
श्रीपाद छिंदमला मायावतींच्या बहुजन समाज पार्टी (बसपा) कडून तिकीट मिळाले आहे. छिंदम नगर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. छिंदमने शुक्रवारी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल राठोड व राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप निवडणूक लढत आहेत.


























































