लष्कराचे कॅप्टन तेजस शिर्के यांच्या आईचा आगीत मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

हिंदुस्थानच्या लष्करात कॅप्टन असलेले तेजस शिर्के यांची आई शुभदा शिर्के यांचा या आगीच्या धुराने घुसमटून मृत्यू झाला. बाराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुभदा शिर्के एकट्याच राहत होत्या. आग लागल्यानंतर त्यांनी जावई निखिल वरंडेकर यांना फोन केला. प्रभादेवी येथे त्यांची मुलगी शुभश्री आणि जावई निखिल राहत होते. ते तिथून तातडीने निघाले, पण ते पोहोचेपर्यंत मृत्यूने शुभदा यांना गाठले होते.

आगीच्या धुरापासून वाचण्यासाठी शुभदा यांनी टेरेसकडे धाव घेतली, मात्र तिथपर्यंत त्या पोहोचू शकल्या नाहीत. धुराने घुसमटून त्यांचा मृत्यू झाला. 15व्या मजल्यावर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांना वाचविण्यासाठी  त्यांचे परळ येथे राहणारे नातेवाईक संजय सावंत यांनीही धाव घेतली होती, मात्र धुरामुळे गुदमरून तेही बेशुद्धावस्थेत पडले. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.