पांड्या व राहुलच्या जागी शुभमन गिल व विजय शंकरला संधी

19

सामना ऑनलाईन । मुंबई

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली आहे. त्या दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या दोघांच्या जागी शुभमन गिल व विजय शंकर यांना संधी देण्यात आली आहे.

पांड्या, राहुलवर निलंबनाची कारवाई; वन-डे मालिकेतून बाहेर

विजय शंकर हा तत्काळ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. तर शुभमनची 23 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय व टी-20 सामन्यांसाठी निवड झाली आहे.

वर्ल्डकपला देखील मुकणार?
हार्दिक पांड्या व राहुल यांच्यावर बीसीसीआयने निलंबनाची कारवाई केली असून जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते कोणताही सामना खेळू शकणार नाहीत. त्यांच्यावरील चौकशीसाठी सहा जणांची समिती नेमण्यात आली असून ही चौकशी जर पाच सहा महिने चालली तर ते आयपीएल व वर्ल्डकपला देखील मुकू शकतात, असे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या