सिद्धूला पुन्हा पाकिस्तानात जायचेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान ऐतिहासिक कर्तारपूर कॉरिडॉर तयार करण्यात आला. या कॉरिडॉरच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून पाकिस्तानने काँग्रेसचे नेते, पंजाब सरकारचे माजी कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण धाडले आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धू यांना पुन्हा पाकिस्तानात जायचेय. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे परवानगी मागणारे पत्र लिहिले आहे.

सिद्धू यांचे यापूर्वीचे पाकिस्तान दौरे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या दौऱयांवरून विरोधी पक्षाने नेहमीच त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सिद्धू यांनी पाकिस्तानात जाण्याआधी पॉलिटीकल क्लियरन्स घ्यावा अशी अट परराष्ट्र मंत्रालयाने सिद्धू यांना घातली आहे.