‘सिल्व्हर ओक’ हल्ला : आरोपी दारूच्या नशेत होते, ब्लड टेस्टमधून उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सिल्व्हर ओक’वर हल्ला करणारे आरोपी दारूच्या नशेत होते हे ब्लड टेस्टमधून उघड झाले आहे. हल्ल्यानंतर 81 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 11 जणांच्या रक्त नमुन्यात अल्कोहोल आढळल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

हल्ल्याच्या आदल्या दिवशी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी बैठक झाली होती. या बैठकीला 20 ते 25 जण उपस्थित होते आणि त्याच बैठकीत हल्ल्याचे नियोजन झाल्याचे तपासातून समोर आले आहे. हल्ला करण्याची सूचना सदावर्तेंची पत्नी जयश्री पाटील यांनी दिल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.