चांदी आठवड्यात 17 हजारांनी स्वस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. अवघ्या आठवडाभरात चांदी तब्बल 17 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर चांदीपाठोपाठ सोन्याच्या किमतीतसुद्धा 4 हजार 796 रुपयांची घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोने प्रति तोळा 1 लाख 42 हजार रुपये तर चांदी पहिल्यांदाच दोन लाखांच्या खाली येऊन प्रति किलो 1 लाख 94 हजार रुपये झाली आहे. सप्टेंबरमध्येही सोने-चांदी स्वस्त झाले होते.