बीडच्या सिंदफणा नदीपात्रात बुडून चार मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

शहाजानपुर येथील सिंधफणा नदी पात्रात चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. या घटनेने गावकरी आक्रमक झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाली आहे.

गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहाजनपुर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार मुलांचा नदीपात्रात बुडवून मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली.

नदीत वाळू उपसा केल्यामुळे तयार झालेल्या खड्ड्यांमुळे ही घटना घडली असल्याची बोलले जात असून यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला आहे.

ही घटना बीड जिल्ह्यातील हद्दीत घडली व हे चारही चिमुकले गेवराई तालुक्यातील आहेत. या हद्दीच्या वादामुळे घटना घडल्यानंतर दोन ते अडीच तास कालावधी उलटून देखील गेवराई आणि बीड येथील प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नव्हती. या कारणामुळे देखील गावकरी आक्रमक झाले आहेत. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.