सिंगापूर, न्यूयॉर्क सर्वात महागडे शहर  

नाइट फ्रँकने नुकताच आपला प्राईम ग्लोबल रेंटल इंडेक्स सादर केला आहे. हा अहवाल जगभरातील दहा प्रमुख शहरांतील घरभाडय़ाचा मागोवा घेतो. प्राइम ग्लोबल रेंटल इंडेक्स डिसेंबर 2022 मध्ये वर्षभरात 10.3 टक्क्यांनी वाढला असून मार्च 2022 मध्ये 11.8 टक्क्यांवर होता. सिंगापूर 2022 च्या चौथ्या तिमाहीत आघाडीवर आहे. सिंगापूरची वार्षिक भाडेवाढ गतवर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत 23 टक्क्यांवरून चौथ्या तिमाहीमध्ये 28 टक्क्यांपर्यंत वाढली. मर्यादित साठा आणि त्या तुलनेत अधिक मागणी यामुळे किमती अधिक आहेत. न्यूयॉर्कने वार्षिक 19 टक्के वाढ नोंदवत या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. त्यापाठोपाठ लंडनने वर्षभरात 18 टक्के भाडेवाढ नोंदवली.