सिंघम अगेन… अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा दिवाळी धमाका; दीपिकाही झळकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय देवगण आणि रोहित शेट्टी हे बॉलिवूडचं हिट कॉम्बिनेशन आहे. या जोडीचा सिनेमा येणार असला की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. ही सुपरहिट जोडी आता पुन्हा एकदा धमाका करणार आहे. सिंघम या चित्रपट मालिकेतला तिसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सिंघम आणि सिंघम रिटर्न्सनंतर आता रोहित शेट्टी सिंघम अगेन हा चित्रपट घेऊन येणार आहे. याच वर्षी जुलै महिन्यात सिंघम अगेनचं चित्रीकरण सुरू होणार आहे. पुढीलवर्षी दिवाळीपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल. अजय देवगणचा भोला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या अजय याच चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. येत्या 30 मार्चला भोला प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटातून मोकळा होताच, अजय सिंघम अगेनच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. यात अजय देवगणसोबत दीपिका पदुकोणही झळकणार आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दीपिका दिसेल. रोहित शेट्टी आणि दीपिकाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता ‘सिंघम 3’च्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत.