
रामायणाचा संदर्भ देताना मध्य प्रदेशातील भाजपच्या आमदाराची जीभ घसरली. त्याने चक्क ‘सीता म्हणजे मृत्यूचे सामान’ असा वादग्रस्त उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. गुणा येथील एका कार्यक्रमात आमदार पन्नालाल शाक्य हे रावणाचा उल्लेख करताना म्हणाले की, तू दुसऱ्याची बायको का उचलून आणलीस? हे विनाशाचे कारण ठरेल, हे मृत्यूचे सामान आहे, असे अनेकांनी त्याला सांगितले. पण त्याने ऐकले नाही. त्या युद्धात सर्व पुरुषच मारले गेले. एकही स्त्री मारली गेली नाही, असे शाक्य म्हणाले. एवढेच नव्हे तर, महाभारतातील द्रौपदी आणि पृथ्वीराज चौहान-संयोगिता यांच्या इतिहासाचे दाखले देत महिलांमुळेच दोन्ही युद्धांमध्ये सैनिकांचे आणि पुरुषांचे प्राण गेल्याचेही शाक्य म्हणाले.



























































