केनियात निवासी इमारतीवर विमान कोसळले, सहा जणांचा मृत्यू

केनियाच्या ईशान्य नैरोबीच्या गिथुराई उपनगरात AMREF फ्लाइंग डॉक्टर्सद्वारे चालवले जाणारे सेस्ना विमान इमारतीवर कोसळल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी ही विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या विमानात चार जण होते. हे विमान सोमालियाच्या सोमालीलँडच्या राजधानी हर्गेइसाकडे जात होते. नैरोबीमध्ये गुरुवारी दुपारी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात एका इमारतीवर हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील चौघांसह सहा जणांचा मृत्यू झाला.