पिंपरीत बेकायदा कारखान्यात स्फोट; सहा ठार

तळवडे रेडझोनमधील ‘स्पार्कल कॅण्डल’ तयार करणाऱया अनधिकृत कारखान्यात काम सुरू असताना अचानक भडका उडून झालेल्या स्फोटात सहा महिला कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर, कारखान्याच्या मालकासह नऊ महिला गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी चार महिलांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्युमुखी पडलेल्या महिलांचा अक्षरशः कोळसा झाला असून, ओळख न पटल्यास डीएनए चाचणी केली जाणार आहे. मृतांपैकी एका महिलेची ओळख पटली आहे.