
‘सीएए’विरोधातील निदर्शनावेळी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी 46 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अमितकुमार यांच्या नेतृत्वाखाली गठीत केलेल्या समितीने 46 लोकांनी ही नोटीस बजावली आहे. 20 डिसेंबरला सीएएविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या या लोकांना सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केल्याचे समोर आले होते. नोटीस बजावलेल्या सर्व लोकांनी 9 जानेवारीपर्यंत या नोटिसीचे उत्तर द्यायचे आहे. दरम्यान, मदरशातील चार विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या आदेशानंतर सोडण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीशांसमोर झालेल्या सुनावणीत पोलिसांनी या विद्यार्थ्यांना क्लीन चिट दिली.

























































