थंडीत त्वचा कोरडी आणि निर्जीव झालीय, तर करून बघा ‘हे’ सोपे उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीच्या दिवसांत त्वचेचा तेलकटपणा कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष पडते. त्यामुळे खाज येणे, त्वचेवर रॅश उठणे, त्वचा काळवंडणे यासारखे त्रास होतात. या कारणांसाठी विशेषत: हिवाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते, पण काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमची त्वचा उजळ आणि चमकदार करू शकता.

त्वचेला मॉईश्चराइज करा
हिवाळ्यात चमकदार त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्वचा नैसर्गिक तेलांमुळे हायड्रेट राहते. त्वचेतील मुलायमपणा टिकून त्वचेची आर्द्रताही टिकून राहते. यासाठी यासाठी खोबरेल तेल, एरंडेल तेल, ऑलिव्ह ऑईल त्वचेला लावावे. यामुळे मुलायमपणआ टिकून राहण्याबरोबरच त्वचा चमकदारही होते तसेच ताक आणि काकडी हे पदार्थ आहारात घ्यावेत. यामुळे नैसर्गिक मॉइश्चरायझर शरीरात टिकून राहते.

भरपूर पाणी प्या
थंडीत तहान कमी लागत असल्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. आपल्या शरीरातून पाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर पडत असते. त्यामुळे थंडीच्या दिवसातही पाण्याची कमतरता भासू देऊ नये हे महत्त्वाचे आहे. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी तुमची त्वचा अधिक चमकदार होईल.

कोमट पाण्याने चेहरा धुवा
हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो, परंतु गरम पाणी त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. कोमट पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा कोरडी आणि खवलेयुक्त होते. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर गरम पाण्याने चेहरा अजिबात धुवू नका. जर तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवू शकत नसाल तर या ऋतूमध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे चांगले. यामुळे थंडी जाणवणार नाही आणि तुमच्या त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून राहील.

रात्री त्वचेची काळजी घ्या
जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल तर त्वचेची रात्रीच्या वेळी काळजी घ्यायला विसरू नका. झोपण्यापूर्वी त्वचेला खोल मॉइश्चरायझ करा. हे रात्री 7-8 तास मॉइश्चराइझर त्वचेवर काम करते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्वचा चमकदार होते. ज्यांना मुरुमांची समस्या असेल त्यांनी रासायनिक उत्पादने वापरू नयेत.