
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (एसआरए) प्रत्येक लाभार्थ्याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी लाभार्थ्याचे बायोमेट्रिक केले जाणार आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड, त्याला कोणत्या प्रकल्पात घर मिळाले हा सर्व तपशील संगणकीकृत केला जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिली.
न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. एसआरए लाभार्थ्याची माहिती डिजिटल करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. दोन पंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. त्यातील एका पंपनीला पंत्राट दिले जाईल. त्यानंतर सर्व तपशील संगणकीकृत केला जाईल.
प्रस्तावित प्रकल्पांमधील झोपडीधारकांचीदेखील सर्व माहिती संगणकीकृत केली जाणार आहे. जेणेकरून एसआरएतील गैरप्रकार व घुसखोरांना आळा घालता येईल, असे महाधिवक्ता सराफ यांनी सांगितले. याची नोंद करून घेत न्यायालयाने एसआरएच्या या उपक्रमाचे काwतुक केले. एसआरएने समाधानकारक उपाययोजना सुरू केली आहे, असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, लाभार्थ्याने घर विकले म्हणून त्याचे संक्रमण शिबिराचे थकीत भाडे मी देणार नाही, अशी भूमिका विकासकाला घेता येणार नाही. विकासकाला एसआरएकडे असलेल्या यादीप्रमाणे संक्रमण शिबिराचे थकीत भाडे द्यावे लागेल, असे आदेश न्यायालयाने विकासकाला दिले.
मालाड येथील श्री आझाद नगर कॉ.हा. सोसायटीचा पुनर्विकास झाला. निवासी व व्यावसायिक, असे एकूण 190 झोपडीधारक येथे होते. या झोपडय़ांचा पुनर्विकास निर्माण रियल्टर्स पंपनीने केला. येथील तब्बल 100 झोपडीधारकांना विकासकाने संक्रमण शिबिराचे भाडेच दिले नाही. भाडय़ाची कोटय़वधी रुपयांची थकबाकी होती. या झोपडीधारकांनी घर विकले. त्यामुळे मी थकीत भाडे देणार नाही, असा दावा विकासकाने केला. त्याविरोधात या लाभार्थ्यांनी अॅड. अल्ताफ खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली. तसेच अॅड. आकाश रेबेलो, अॅड. आसीफ हुसेन यांनी युक्तिवादास मदत केली.





























































