
केंद्राने 2022-23 या आर्थिक वर्षाच्या आजच्या शेवटच्या दिवशी छोटय़ा बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छोटय़ा गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर 8 टक्क्यांवरून 8.2 टक्के करण्यात आले. राष्ट्रीय बचत पत्र योजनेतील व्याजदर 7 टक्क्यांवरून 7.7 टक्के, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढवून 7.6 टक्क्यांहून 8 टक्के तर किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आला आहे, मात्र पीपीएफवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवे व्याजदर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत.




























































