जगातील सर्वात छोटी कार

आजही असे काही लोक आहेत, जे शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे लहान आकाराच्या गाडय़ांना पसंती देतात. आता जगातील सर्वात लहान आकाराची कार कोणती? असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. या गाडीचे नाव आहे पील पी 50. युरोपीय देशातील रस्त्यांवर धावणाऱया या कारची लांबी 134 सेंटिमीटर तर रुंदी 98 सेंटिमीटर इतकी आहे, कारचे वजन अवघे 59 किलो आहे.

जगातील सर्वात छोटी कार म्हणून या कारची 2010 साली गिनीज बुकात नोंद झाली आहे. पील कारमध्ये 49 सीसीचे टू स्ट्रोक इंजिन आहे. या कारमध्ये 3 स्पीड मॅन्युअल गेअर बॉक्स आहे. कारचा टॉप स्पीड 61 किमी प्रति तास इतका आहे. पी 50 ची निर्मिती पहिल्यांदा 1965 साली करण्यात आली होती. त्यानंतर 2010 साली पुन्हा या गाडीची निर्मिती करून ती बाजारात आणली.  कंपनीने या कारचे इलेक्ट्रॉनिक व्हेरिएंट लॉन्च केले असून ई-कारची किंमत 84 लाख रुपये आहे. तरीही या कारला मोठी पसंती मिळतेय.