पुण्यात राम के नाम… फसला, रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणी माघारी

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या आणि पुण्यातील हेरिटेज हॅण्डविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित ‘राम के नाम दो धागे’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, काही टाळकी वगळता पुणेकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे रिकामे मैदान बघून पेंद्रीय मंत्री स्मृती इराणी आल्या तशाच परत गेल्या.

अयोध्यामध्ये उभारल्या जाणाऱया मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीला परिधान करण्यात येणारे वस्त्र विणण्यासाठी आयोजित मॉडर्न कॉलेजच्या मैदानावर ‘दो धागे श्रीराम के लिए’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पेंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सायंकाळी सव्वासहा वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्या. त्यांच्यासमवेत श्रीराम जन्मभूमी न्यासाचे गोविंद देवगिरी महाराज, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे आदी दाखल झाले. यावेळी आयोजकांमधील चार-पाच प्रतिनिधी आणि वीस ते पंचवीस माणसे वगळता संपूर्ण मैदान आणि त्यावरील शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या.
इराणी आणि त्यांच्यासमवेत आलेले मान्यवर व्यासपीठावर न जाता खालीच उपस्थित जागेत बसले. काही मिनिटे थांबून आणि रिकाम्या खुर्च्या बघून व्यासपीठावर न जाता इराणी खालूनच निघून गेल्या. अनघा घैसास म्हणाल्या, या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा येणार होते; परंतु त्यांचा दौरा रद्द झाला. स्मृती इराणी या कार्यक्रमाला भेट देऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे त्या भेट देऊन मुंबईला गेल्या.

भाजपप्रेमींचे शिल्लक हिंदुत्व

– भाजपप्रेमी मंडळी या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणावर उपस्थित राहतील, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र, काही 15 ते 20 टाळकीच या कार्यक्रमाला उपस्थित होती.