
बंगळुरूच्या नेलमंगल ते सोलापूरच्या बाळेदरम्यान दक्षिण पश्चिम रेल्वेवरील पहिल्या रो-रो सेवेचे रविवारी उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे बंगळुरू आणि सोलापूरदरम्यान रस्ते वाहतुकीसाठीचा इंधनाचा खर्च, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषणाचा त्रास हे सर्व वाचणार आहे. एकावेळी ट्रेनवर 42 ट्रक चढवून या सेवेचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.
Karnataka: Roll On Roll Off (RORO) service of South Western Railway from Nelamangla (near Bengaluru) to Bale (near Solapur, Maharashtra) was flagged off, today. pic.twitter.com/xkjvIvRWb3
— ANI (@ANI) August 30, 2020
रॉल ऑन रॉल ऑफ (रो रो) सेवेचा 1999 मध्ये सर्वप्रथम कोकण रेल्वेवर प्रारंभ झाला होता. अजूनही ही सेवा कोकण रेल्वेवर यशस्वीपणे सुरू आहे. बंगळुरू आणि सोलापूरदरम्यान मोठया प्रमाणावर मालवाहतूक होते. या नव्या वाहतुकीच्या माध्यमामुळे एपीएमसी मार्केटचा कृषीमाल कोणत्याही ट्रफिकमध्ये न अडकता देशभरात पोहचविता येणार आहे. दरम्यान, रो रो सेवेमुळे एका फुल लोडिंग ट्रिपमुळे एका वेळेला रेल्वेला 34 लाखांचा महसूल मिळणार आहे.
























































