
‘सोलापूर जिह्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील,’ असे विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी सांगितले.
डॉ. नीलम गोऱहे यांनी आज नियोजन भवनात शासकीय अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीत निर्माण झालेल्या अडचणी, त्यानंतर केलेली मदत यांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱहे म्हणाल्या, ‘कोरोनाकाळात खासगी रुग्णालयांच्या बिलांबाबत 2977 तक्रारी आल्या होत्या. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुमारे दोन कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. सुमारे 41 अनाथ मुले ज्यांचे आई-वडील दगावले आहेत, अशांना कायदेशीर सेवा योजनेअंतर्गत मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच ग्रामीण भागात शासकीय कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबविण्यात यावा, जिह्यातील नगरपालिकांनी घनकचऱयाचे व्यवस्थापन करावे,’ अशा सूचनाही डॉ. नीलम गोऱहे यांनी दिल्या. दरम्यान, सोलापूर शहरातील ‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावाही त्यांनी घेतला. ‘जिह्यातील असंघटित, तसेच बांधकामक्षेत्रातील कामगारांना 54 कोटी 86 लाख रुपये शासनाकडून मदत देण्यात आली आहे,’ असेही डॉ. नीलम गोऱहे यांनी सांगितले.
ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हातभट्टी दारू तयार करणाऱया तांडय़ावरील महिलांचे आर्थिक पुनर्वसन करण्यासाठी योजना राबविल्या आहेत. याची प्रशंसा करून अशा योजनेला समाजाचे पाठबळ मिळणे महत्त्वाचे असल्याचे डॉ. नीलम गोऱहे यांनी सांगितले.उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला संघटिका अस्मिता गायकवाड, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, अमर पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.

























































