
जुलै महिना सुरू झाला, तरी अद्यापि जिह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. सोलापूरसह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली, तरी ग्रामीण भाग अजूनही तहानलेलाच आहे. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी पुरेशा पावसाची अजूनही शेतकऱयांना प्रतीक्षा आहे.
सोलापूर शहर, वैराग परिसर, नातेपुते शहर व उत्तर सोलापूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली, तरी अद्यापि जिह्यात पावसाने दांडी मारली आहे. जूनअखेर झालेल्या अल्पशा पावसाने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळकेढा व अक्कलकोट तालुक्यांत काही प्रमाणात शेतकऱयांनी खरिपाची पेरणी केलेली आहे. मात्र, अक्कलकोट व मंगळकेढा तालुक्यांत ज्यांनी पेरणी केली, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आह़े लवकरात लवकर चांगला पाऊस न झाल्यास केलेली पेरणीही वाया जाण्याची भीती आहे.



























































