सोलापूरमध्ये जीप व बसमध्ये भीषण अपघात, 4 जण ठार

642

सोलापूरमध्ये जीप व बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार झाले आहेत. तर दहा जण गंभीर जखमी झाले. वैरागजवळील राळेरास येथे हा अपघात झाला. जखमींमधील पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही एसटी बस बार्शीकडून सोलापूरला निघाली होती. त्यावेळी या बसने जीपला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की चीपचा चक्काचूर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या