
सोलापूर-पुणे ई-बस सेवा लवकरच सुरू होणार असून, येथील विभागाच्या बस डेपोत महावितरणच्या मदतीने चार्जिंग स्टेशनची उभारणी झाली आहे. सोलापूर विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे 25 बसगाडय़ांची मागणी केली आहे. तेथून बस उपलब्ध झाल्यानंतर या मार्गावर बससेवा सुरू होईल, असे विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी सांगितले. आगामी काळात पंढरपूर, मंगळवेढा व अक्कलकोट येथूनदेखील ई-बससेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात विजेकर चालणाऱया वाहनांची विक्री काढल्याने विजेची विक्री सप्टेंबर 2022 मध्ये 4.56 दशलक्ष युनिटवरून जुलै 2023 मध्ये 14.44 दशलक्ष युनिट झाली आहे. दहा महिन्यांत विजेची विक्री तिप्पट काढली आहे. दरम्यान, सोलापूर जिह्यात नऊ हजारांवर वाहने रस्त्यांवर धावत असून, त्यात सहा हजार 778 दुचाकी आहेत.
महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी महावितरण नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱया वाहनांसाठी ‘महावितरण’च्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ऍपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे, अशी विविध कामे केली जातात.
राज्यात महावितरण व खासगी अशी एकूण तीन हजार 214 चार्जिंग स्टेशन असून, त्यात सोलापूर जिह्यातील दोन स्टेशनचा समावेश आहे. चार्जिंगवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आगामी काळात चार्जिंग स्टेशन वाढविण्याचे महावितरणचे नियोजन आहे.
विद्युत वाहनांमुळे पैशांची बचत
विद्युत वाहनांमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होतेच; पण पैशांची बचतदेखील मोठी आहे. पेट्रोलकरील पारंपरिक दुचाकीला इंधनाचा खर्च प्रतिकिलोमीटर सुमारे 2 रुपये 12 पैसे येतो. पण, विद्युत दुचाकीला प्रतिकिलोमीटर अवघा 54 पैशांचा खर्च येतो. पेट्रोलवरील चारचाकी वाहनाला प्रतिकिमी सुमारे 7 रुपये 57 पैसे खर्च असून, विद्युत चारचाकीला प्रतिकिमी अवघा दीड रुपयांपर्यंतच खर्च होतो. तीनचाकी गाडीचा प्रतिकिमी खर्च 59 पैसे होतो.



























































