माढा येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार माढा येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मदत केंद्रामुळे माढा तालुक्यातील दुष्काळ, ओला दुष्काळ,अतिवृष्टी यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सोलापूर रस्त्यावरील शिवसेना माढा शहर कार्यालयात जलसंधारण मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत, जिल्हा समनव्यक प्रा .शिवाजी राव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सकाळी 11 वाजता मदत केंद्र सुरू करण्यात आले. शेतकरी मदत केंद्रात शेतकऱ्यांना सरकारी योजना व विमा कंपन्या तसेच बँकामधील कर्जाबाबत माहिती तसेच सहकार्य मिळणार आहे

यावेळी पृथ्वीराज सावंत, शिवसेनेचे विधानसभा उमेदवार संजय कोकाटे, तालुका प्रमुख मधुकर देशमुख, माढा शहर प्रमुख शंभू साठे , माजी जि प सभापती शिवाजीराजे कांबळे, माजी जि प सदस्य आनंद कानडे ,माढा युवा सेना अध्यक्ष भैय्या खरात , युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन बागल, युवा सेनाशहराध्यक्ष टेम्बुर्णी कुलदीप पाटील, यादी मान्यवर पदाधिकारी ,शिवसैनिक, व शेतकरी उपस्थित होते.