सोलापूरमध्ये खरेदीसाठी बाजारात गर्दी, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे वाजले बारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या तीन-चार दिवसाच्या कडक संचारबंदी नंतर आज सकाळी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले असून यावेळी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला आहे.

शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील इतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कालच सोशल डिस्टन्सिंगची अट घालून शिथीलता जाहीर केली होती. तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथकांद्वारे नागरीकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते तर काही ठिकाणी सौम्य बळाचा वापरही पोलिसांना करावा लागला.