पिंगुळी विभागात आमदार वैभव नाईक यांच्या जनसंवाद अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वसामान्य जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार केले. मतदार संघाची जबाबदारी सोपवली. लोकांनी सोपलेली हि जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडली असून मतदारसंघातील लोकांच्या सहकार्यामुळे प्रत्येक गावात लोकांना अपेक्षित असलेला विकास करण्यास मला यश आले. त्यामुळे आज मी ताठ मानेने मतदार संघात फिरू शकत आहे. केवळ निवडणुकीपुरताच नव्हे तर अनेक वेळा वेगवेगळ्या कारणाने प्रत्येक गावात मी जात आहे. तेथील लोकांचे प्रश्न लक्षात घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक काळात जी जी आश्वासने दिली ती आपण पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी येथे जनसंवाद अभियानात शुक्रवारी ग्रामस्थांशी संवाद साधताना केले.

कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांनी १ ऑगस्ट पासून सुरु केलेले जनसंवाद अभियान शुक्रवारी पिंगुळी विभागात दाखल झाले. पिंगुळी विभागातील मुळदे, मांडकुली, केरवडे, तुळसुली, साळगाव, पिंगुळी टेंबधुरीनगर, शेटकरवाडी सराफदारवाडी, गोंधळपूर, राऊळवाडी, देऊळवाडी यठिकाणी भेटी देऊन ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.गावातील समस्या जाणून घेतल्या, पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगुळी विभागात आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या विकास कामांची माहिती लोकांना देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या समस्या प्रश्न आ. वैभव नाईक यांच्या समोर मांडले याला समाधान कारक उत्तरे देत येत्या काळात लोकांचे प्रश्न समस्या त्याचप्रमाणे उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी दिले. पिंगुळी विभागात जनसंवाद अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

आमदार वैभव नाईक म्हणाले, मांडकुली पूल २५ वर्षे प्रलंबित होता २५ वर्षात झाले नाही ते माझ्या सारख्या नवख्या आमदाराकडून कसे होईल अशी शंका अनेकांमध्ये होती. मात्र हा प्रश्न गेले दीड वर्षे पाठपुरावा करून मार्गी लावला. त्यांच प्रमाणे हायवे चौपदरीकरण, कुडाळ, ओरोस येथे सुसज्ज बसस्थानक, चांदा ते बांदा योजनेतून शेतकरी, महिलांसाठी विविध उपक्रम, कृषी यांत्रिकीकरण योजनेतून संपूर्ण महाराष्ट्रात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १ हजार पॉवर टिलरचे वाटप, मतदार संघातील रस्ते ववीज पाणी या समस्या सोडविल्या, विजेच्या झालेल्या हानीबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये मंजूर करून जिल्हयात आणण्यात आले, त्यातील सुमारे ५६ लाखाची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला १० हजाराची मदत केली जात आहे. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना ५ लिटर केरोसीनचाही पुरवठा केला जात आहे. ज्या ज्या ठिकाणी पूरस्थिती उदभवली त्या सर्व ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्याने गावागावात वाडीवाडीत पोहचून शिवसनेच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपर्यत पोहचवावीत. असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

जनसंवाद अभियानावेळी मुळदे येथे कुडाळ-मालवण विधानसभा शिवसेना महिला संपर्क प्रमुख सूचिता चिंदरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख(कणकवली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ ) संजय पडते, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, जिल्हापरिषद सदस्या वर्षा कुडाळकर, उपसभापती श्रेया परब,युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, अतुल बंगे, गंगाराम सडवेलकर,शाखा प्रमुख शिवराम पालव, सरपंच गरुनाथा चव्हाण, गणपत यादव, भिकाजी जाधव, विष्णू जाधव, शंकर पालव, मांडकुली येथे सरपंच तुषार सामंत, उपसरपंच दिलीप नेचम , निलेश सामंत, शाखा प्रमुख निलेश खानोलकर, सुरेश पेडणेकर, श्री मुळीक, प्रसाद वारंग, सिद्धेश धुरी, तुळसुळी येथे उप विभाग प्रमुख विजय वारंग,माजी पं स सदस्य बाबा वारंग, शाखाप्रमुख उदय तुळसुळकर, हरिशचंद्र माईणकर, केशव वारंग, राजन तुळसुळकर, ग्रा. प सदस्य विजया सावंत, साळगाव येथे विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, उपविभाग प्रमुख हंसराज सावंत, मनोज पवार, संदीप कोरगावकर, उपशाखाप्रमुख नामदेव तावडे, हेमंत सावंत, ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम लाड, बाबाजी सावंत, शांताराम धुरी, संतोष कोरगावकर, सावित्री कोरगावकर, शरद माळगावकर आबा धुरी, संदीप सावंत, पिंगुळी येथे सरपंच निर्मला पालकर, शाखा प्रमुख आदेश धुरी, उपविभाग प्रमुख महेश पालकर, भरत धुरी, मंगेश साळूंखे, गणेश सातार्डेकर, संतोष मेस्त्री. रवी पालकर, साई भैरवकर, प्रवीण सावंत, निखिल सावंत,ओंकार पालकर, मुकुंद सावंत, सुचिता पालकर, मिलन मोर्ये, दीप्ती सावंत आदी उपस्थित होते.