अॅपेंडिक्सवर गुणकारी उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. शेखर दीक्षित

अॅपेंडिक्स हा आजार आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. आहारातील बदल, सध्याची बदललेली जीवनशैली ही यामागची महत्त्वाची कारणे… बद्धकोष्ठता, उलटी, असह्य पोटदुखी ही या आजाराची काही लक्षणे आहेत. पाहूया या आजाराची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय…

  • अॅपेंडिक्समध्ये पोटाच्या उजव्या बाजूला सूज येते आणि वेदना होतात. यामुळे शस्त्रक्रिया करावी लागते. अॅपेंडिक्स अतिशय वेगाने वाढते. एक्यूट अॅपेंडिक्स या प्रकारचा अॅपेंडिक्स अतिशय  कमी जणांना होतो. याची लक्षणे सहज ओळखता येत नाहीत.
  • पाठीत सतत वेदना, भूक कमी लागणे, सतत उलटी व चक्कर, जुलाब होणे, लघवीला वेदना, मलाशय, पाठ किंवा पोटामध्ये वेदना होणे, जास्त थंडी वाजणे आणि शरीर थरथरणे, पोटामधील गॅस व्यवस्थित बाहेर न पडणे ही अॅपेंडिक्स आजाराची लक्षणे आहेत.
  • अॅपेंडिक्सच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी आले हे रामबाण औषध म्हणून वापरू शकता. रोज दिवसातून कमीतकमी दोन वेळा आल्याचा चहा प्यावा. काही दिवसातच गुण दिसायला सुरुवात होईल.
  • अॅपेंडिक्स आतड्यांच्या आतमध्ये असतो. यापासून वाचण्यासाठी दररोज पालक सूप किंवा पालकची भाजी खावी. पालक ऍपेंडिक्स बरा करण्यासोबत अनेक रोगांपासून वाचवते.
  • ज्यांना अॅपेंडिक्स हा विकार आहे, त्यांनी आपल्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. जेवणाच्या अगोदर एक पिकलेला टोमॅटो कापून त्यामध्ये सैंधव मीठ घालून खावे.
  • सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावून खा.
  • अॅपेंडिक्सच्या वेदनेपासून आराम मिळण्यासाठी ताकामध्ये काळे मीठ टाकून प्यायल्याने खूपच फायदा होतो. यामुळे शरीरामध्ये जमा झालेली विषारी द्रव्ये बाहेर पडतात.
  • सफरचंद, सॅलेड, हिरव्या पालेभाज्या अशा फायबरयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. चटपटीत आणि मसालेदार पदार्थ टाळा.
  • कोरफडीचा रस प्यायल्याने पोटातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होऊन पोट स्वच्छ राहते.