असं झालं तर… तुमचे टपाल गहाळ झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 पार्सल निर्धारित वेळेत पोहोचले नाही किंवा गहाळ झाले, तर पावतीवरील 13 अंकी ट्रकिंग नंबर (उदा. AA123456789IN) वापरून India Post Tracking वर सद्यस्थिती तपासा.

2 टपाल वेळेवर न मिळाल्यास India Post Complaint पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. स्पीड पोस्टचे शुल्क परत मिळण्याची तरतूद आहे.

3 टपाल गहाळ किंवा खराब झाल्यास मूळ शुल्काच्या दुप्पट किंवा कमाल रु. 1 हजारापर्यंत भरपाई मिळू शकते. 17 मार्च 2026 पासून एक नवीन वितरण सेवा सुरू केली आहे.

4 या नवीन सुविधेअंतर्गत निवडक शहरांमध्ये 24 तासांच्या आत पार्सल पोहोचवले जातील. पाठवलेली पार्सल्स दुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 तासांच्या आत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे.

5 दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून पार्सल्स अनेक प्रकरणांमध्ये ती विमानानेही पाठवली जाईल.