
रुबिक्स क्यूब सोडवणे म्हणजे बुद्धीचा कसं लागण्यासारखे आहे. रुबिक्स क्यूब सोडवता सोडवता भल्याभल्यांच्या नाकीनऊ येतात. पण एका पठ्ठय़ाने अवघ्या 12.90 सेकंदामध्ये रुबिक्स क्यूब सोडवले आहे. ते देखील सायकल चालवत असताना. विश्वास बसत नाही ना…पण हे अगदी खरंय.
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून या मुलाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सर्वज्ञ कुलश्रेष्ठ असे या जीनियस मुलाचे नाव आहे. 15 वर्षांचा सर्वज्ञ हा गुरुग्राम येथील रहिवासी आहे. ज्यापद्धतीने तो काही क्षणात रुबिक्स क्यूब सोडवतो ते पाहून अनेकांनी त्याच्या टॅलेंटचे काwतुक केले आहे. त्याच्या या कामगिरीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येदेखील नोंद झाली आहे.
























































