पाकिस्तानी खेळाडूचा होता सोनालीवर डोळा, प्रस्ताव नाकारल्यास अपहरणाचा केला डाव; पण…

4531

नव्वदच्या दशकात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली. देशभरातच नाही तर जगभरात तिचे लाखो चाहते, दिवाने आहेत. यातील एक नाव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचेही आहे. मैदानावर वेगवान चेंडूने फलंदाजांच्या दांड्या उडवणारा शोएब सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) हिच्या अदांवर फिदा झाला होता.

शोएब अख्तर सोनालीच्या प्रेमात पडला होता आणि एका मुलाखतीत त्याने आपल्या मनातील गोष्ट बोलूनही दाखवली होती. शोएबला सोनाली एवढी आवडत होती की त्याने तिचे अपहरण करायचा डाव देखील आखला होता. या मुलाखतीत त्याने सोनालीसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा देखील सांगितला.

shoaib-akhtar

हिंदुस्थान दौऱ्यावर आल्यानंतर सोनालीशी भेट झाली होती. त्यावेळी पहिल्या भेटीतच मी तिच्यावर फिदा झालो होतो, असे शोएबने सांगितले. तसेच सोनालीची भेट होण्यापूर्वी तिला चित्रपटात पाहिले होते आणि तेव्हापासून ती मला आवडत होती, असेही शोएबने सांगितले.

sonali-bendre-new

‘इंग्लिश बाबू देसी मेम’ या चित्रपटात मी तिला पहिल्यांदा पाहिले होते. मला ती एवढी आवडू लागली की तिचा फोटी माझ्या वॉलेटमध्ये कायम असायचा, असेही शोएब सांगतो. प्रेमात आकंठ बुडालेल्या शोएबने सोनालीने प्रस्ताव नाकारल्यास तिचे अपहरण करण्याचा डावही आखला होता, असेही डोळे मिचकावत सांगितले. पण आपण शोएब नावाच्या कोणत्या खेळाडूला ओळखतही नाही असे तेव्हा सोनाली म्हणाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या