
लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. लडाख पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लडाखला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांना चिथावल्याचा आरोप वांगचुक यांच्यावर करण्यात आला आहे. लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सरकारने सोनम वांगकुच यांच्या एसईसीएमओएल एनजीओचा परवाना रद्द केला होता. यानंतर सोनम वांगचुक यांना अटक केल्याचे वृत आहे.
Climate activist Sonam Wangchuk arrested by Ladakh police team led by DGP S D Singh Jamwal: Officials. pic.twitter.com/muxsxhSa5U
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2025
लेहमधील हिंसाचारानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक एसडी सिंह जमवाल यांच्या नेतृत्वातील पोलिसांच्या टीमने सोनम वांगचुक यांना अटक केली. वांगचुक यांना अटक केल्यानंतर खबरदारी म्हणून लेहमधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच ब्रॉडबँडचा स्पीडही कमी करण्यात आला आहे. गेल्या बुधवारी 24 सप्टेंबरला लेहमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात 4 ठार तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.
लेह जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवस सर्व सरकारी आणि खासगी शाळा, कॉलेजेस आणि आंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कारगिलसह इतर शहरांमध्ये जमावबंधी लागू करण्यात आली आहे.