सोनिया गांधी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी राजस्थानमधील जयपूर येथून उमेदवारी अर्ज भरला होता.

सोनिया गांधी या गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आल्या आहेत. मात्र यंदा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा असे होत आहे.

प्रियांका गांधी रायबरेलीतून लढवणार

सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणूकीतून माघार घेतल्याने आता रायबरेली मतदारसंघाची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रियांका गांधी यांना उतरवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.