सोनिया गांधींची आजची एकमेव सभाही रद्द, चर्चांना उधाण

sonia-gandhi

हरयाणा, महाराष्ट्र या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांकडे साऱ्या देशाचे लक्ष्य आहे. 21 ऑक्टोबर रोजी या दोन्ही राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी प्रचारफेऱ्या संपणार आहेत. त्यामुळे प्रचाराची वेळ संपण्यास दीड दिवसांचा अवधी उरला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या शुक्रवारी म्हणजे आज एकमेक सभा हरयाणात घेण्यात येणार होत्या. मात्र ऐनवेळी त्यांनी सभेला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांची सभा रद्द होऊन आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ही सभा घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. ऐनवेळी करण्यात आलेल्या या बदलामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

यंदा दोन्ही राज्यात काँग्रेसपक्षाकडून प्रचारावर फारसे लक्ष दिले गेलेले नाही. राहुल गांधी हे प्रचाराच्या काळात विदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांच्यावर टीका झाली. तसेच या प्रचार काळात सोनिया गांधी यांची हरयाणातील महेंद्रगड येथे एकमेक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या सभेकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र आज पहाटे अचानक सोनिया गांधी या सभेकरता उपस्थित राहू शकणार नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी पसरली. असे असले तरी राहुल गांधी हे आता या सभेला संबोधित करणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या