केंद्राकडून विशेष पोलीस पदक; महाराष्ट्रातील 11 पोलीस, अधिकाऱ्यांचा सन्मान

167
maharashtra-police2

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष पोलीस पदक देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट तपास कार्यासाठी त्यांचा गौरव झाला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्याची केंद्राने दखल घेतली. देशभरातील 96 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विशेष पदक देण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे गेल्या वर्षीपासून उत्कृष्ट तपास कार्यासाठी पोलिसांना विशेष पदक दिले जात आहे. या वर्षी देशभरातील 96 पुरस्कार्थींमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह अन्य राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रातर्फे विशेष पदक देऊन गौरवले जाते.

विशेष पोलीस पदकाचे महाराष्ट्रातील मानकरी

पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर, संजय निकुंबे, सुधाकर देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माने यांच्यासह श्रद्धा वायदांडे आणि प्रियंका शेळके या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा विशेष पोलीस पदकाने गौरव झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या