Ashadhi Ekadashi – आषाढी एकादशीसाठी रेल्वे विशेष गाड्या चालवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे दि. 09.07.2022 आणि 10.07.2022 रोजी जालना – पंढरपूर, नांदेड – पंढरपूर आणि संभाजीनगर- पंढरपूर दरम्यान आषाढी एकादशी विशेष गाड्या चालवणार आहे, तपशील खालीलप्रमाणे आहेतः

1) जालना – पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07468 आषाढी विशेष जालना येथून दि. 9.7.2022 रोजी 19.20 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 6.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07469 आषाढी विशेष पंढरपूर येथून दि.10.7.2022 रोजी 20.30 वाजता सुटेल आणि जालना येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता पोहोचेल.

थांबे: परतूर, सेलू, मानवत रोड, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन, कुर्डुवाडी.

संरचना: 2 शयनयान, 4 द्वितीय श्रेणी आरक्षित, 2 लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.

2) नांदेड – पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07498 विशेष गाडी नांदेड येथून दि. 9.7.2022 रोजी 15.00 वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी 10.35 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07499 विशेष पंढरपूर येथून दि. 10.7.2022 रोजी 21.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 17.45 वाजता नांदेडला पोहोचेल.

थांबे: पूर्णा जंक्शन, परभणी जंक्शन, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगांव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, तंदूर, सेडम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डुवाडी.

संरचना: एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, एक गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि एक जनरेटर व्हॅन.

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरु, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय

3) संभाजीनगर – पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक 07515 विशेष संभाजीनगर दि
9.07.2022 रोजी 21.40 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 07516 विशेष पंढरपूर येथून दि. 10.07.2022 रोजी 23.00 वाजता सुटेल आणि संभाजीनगर येथे दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल.

थांबे: जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, धाराशीव, कुरुडवाडी

संरचना: 2 शयनयान, 5 द्वितीय श्रेणी आरक्षित, दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह 10 सामान्य द्वितीय श्रेणी.

4) भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष

गाडी क्रमांक 01123 विशेष गाडी भुसावळ येथून दि. 9.7.2022 रोजी 13.30 वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01130 विशेष पंढरपूर येथून दि. 10.7.2022 रोजी 22.30वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 13.00 वाजता भुसावळला पोहोचेल.

थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, नगर, दौंड, कुर्डुवाडी

संरचना: 2 शयनयान, 2 लगेज व गार्ड ब्रेक व्हॅनसह 16 सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: 07469, 07499 आणि 07516 आषाढी विशेष गाड्यांची बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरू आहे.