विलेपार्ल्यात ‘वुमन’ नाटकाचा खास शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘वुमन’ या नाटकाचा खास शो रविवार, 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मास्टर दीनानाथ नाटय़गृह, विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला आहे. ऋषिकेश घोसाळकर लिखित आणि दिग्दर्शित ‘वुमन’ या नाटकात आजच्या युवतींचे जग आणि त्यांचे भावविश्व यांचे दर्शन घडते. आजची स्त्र्ााr जगाच्या दृष्टीने ‘मुक्त’ झाली असली तरी तिचे व्यक्तिमत्त्व खऱया अर्थाने मुक्त झाले आहे काय? एक उपभोग्य वस्तू म्हणून तिच्याकडे आजही बघितले जाते. स्त्र्ााrची ही ‘अनटोल्ड स्टोरी’ या नाटकात आहे. ऋषिकेश घोसाळकर यांचे हे 11 वे व्यावसायिक नाटक आहे. यात हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, विभूती सावंत, सायली चौगुले, अक्षता साळवी, विनोद देहरे, सनीभूषण मुणगेकर आणि ऋषिकेश घोसाळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हसता हसता गंभीर विषयाकडे नेऊन अंतर्मुख करणाऱया ‘वुमन’ नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.