तृतीयपंथीयांसाठी खास शौचालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tiolets for transgenders

दिल्ली मेट्रोने आता आपल्या स्थानकांत तृतीयपंथीयांना सोयीचे ठरावे म्हणून खास शौचालये उभारली आहे. सध्या दिल्ली मेट्रोच्या विविध स्थानकांत अशी विशेष 347 शौचालये उभारली आहेत. सध्या दिव्यांगजनांसाठी विशेष शौचालये मेट्रोने उभारली आहेत. त्याचाही तृतीयपंथीयांना वापर करता येणार आहे. सामान्य नागरिकांच्या शौचालयाशेजारीच ‘दिव्यांगजन आणि तृतीयपंथीयांसाठी’ अशा पाट्या लावलेली खास शौचालये दिल्ली मेट्रोने उभारली आहेत. दिल्ली मेट्रो 390 किमी अंतरांपर्यंत दिल्लीकरांना सेवा देते.