दिल्लीतील मजूर परतणार स्वगृही, 1200 मजुरांसाठी विशेष ट्रेन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
passenger-train

कोरोना मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात अनेक मजूर अडकले आहेत. त्यांना आपल्या घरी सोडण्यासाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. दिल्लीतून 1200 मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन मध्य प्रदेशला रवाना होणार आहे.

24 मार्च रोजी लॉकडाऊन जारी केल्यानंतर हजारो संख्येने मजूर पायीच आपल्या घरी निघाले होते. नंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झाली होती. तेव्हा अनेक मजुरांना बसमधून आपल्या स्वगृही पाठवले होते, तर काहींना विलगीकरण कक्षात ठेवले होते.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर मजूर आपल्या घरी जाऊ शकतात. राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे.

रेल्वेकडून आतापर्यंत 100 ट्रेन चालवण्यात आल्या आह्त. त्यात 1 लाख मजूर घरी पोहोचले आहेत. सर्व मजुर घरी पोहोचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश आहेत. 14 दिवसांनंतर त्यांची कोरोना टेस्ट होणार आहे. अनेक राज्य सरकारांनी बसच्या माध्यमातून आपल्या लोकांना स्वगृही आणले आहे.