
उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबई-मडगाव मार्गावर 18 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या गाड्या 5 एप्रिल 2026 ऐवजी 12 एप्रिल 2026 पासून चालविण्यात येतील.
दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी या स्थानकांवर या विशेष गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन क्रमांक 01019 ही साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवारी 00.55 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी 15.15 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01020 साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत मडगाव येथून दर रविवारी दुपारी 16.00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.


























































